shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजगुरुनगर येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा..!!

-----------------------------------------------------------
राजगुरुनगर प्रतिनिधी। विद्याधर साळवे, दि.२६-१०-२०२०.
राजगुरुनगर (ता. खेड) येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून साजरा करण्यात आला.
              

रविवार दिनांक २५ रोजी अशोक विजयादशमी दिनी ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजगुरुनगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता भन्ते सुदन्त यांच्या हस्ते बुद्ध वंदना, धम्म वंदना , पूजापाठ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोकराव कडलक , उपाध्यक्ष पि.के. पवार , कार्याध्यक्ष संतोष डोळस , विद्याधर साळवे, विजय घेगडमल , सिद्धार्थ कडलग, विठ्ठल डोंगरे, दीपक नितनवरे, प्रकाश मोरे , राजू भोसले , अश्विनी मोरे , रवींद्र गायकवाड, सर्वेश म्हस्के आदी मान्यवर व खेड तालुका भारतीय बौद्ध महासभा, बोधिसत्व धम्म वंदना मैत्री संघ, राजगुरुनगर येथील नागरिक उपस्थित होते. यावेळी संपूर्ण दिवसभर नागरिकां कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत होते.
close