shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोमवारपासून पुणे-लोणावळा लोकल सुरू, ई-पास दाखवल्यानंतरच मिळणार तिकीट..!!

पुणे:-राज्यशासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल सेवा सुरू होणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. पण या लोकलमधून प्रवास करण्याआधी पोलिसांनी दिलेला क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक असणार आहे. 


कारण ई पास दाखवल्या नंतरच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.पुणे व लोणावळ्यातून सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एक लोकल सुटणार आहे. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. मोबाईल किंवा स्थानकावरील मशिनद्वारे तिकिटाची व्यवस्था बंद असल्यामुळे प्रवाशांना प्रत्येक रेल्वे स्थानकावर तिकीट घ्यावे लागणार आहे.

यापूर्वी मोबाईल द्वारे आणि स्थानकावरील मशिनद्वारे तिकीट घेणे शक्य होते. परंतु लॉकडाउन नंतर आलेल्या निर्बंधामुळे ही सुविधा अजूनही बंद आहे. त्यामुळे आता रेल्वेस्थानकावरील तिकीट खिडकीवर तिकीट मिळणार आहे. त्यासाठी पुढील नियोजन हे करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
close