shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा.आत्मचरित्र ग्रंथप्रकाशन व प्रवरा शिक्षण संस्थेला डॉ. बाळासाहेब विखे नामकरण पंतप्रधानाच्या हस्ते व्हर्च्युअलने संपन्न..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी) :
 महाराष्ट्र ही साधुसंत महंतांची, थोर पुरुष, वीरमातांची  पवित्र भूमी आहे.  येथेच सहकार क्षेत्रातील  नेते  पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे  देह वेचावा कारणी या संत तुकाराम महाराजांच्या  वाक्यातून खरे अर्थी त्यांचे जीवन चरित्र या  पुस्तकरूपी ग्रंथातून समजून येते.असे शुद्ध मराठीत  पद्मविभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र प्रकाशन व्हॅर्च्युअल सोहळ््यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत व अधून मधून मराठी बोलत,जणु निम्मे भाषणच चक्क मराठीतूनच केले. व यावेळी  प्रवरा एज्युकेशन संस्थेचे नाव बदलून  पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील शैक्षणिक संस्था असे  करण्यात आले. हा कार्यक्रम  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने कळ दाबून व्हर्च्युअल पद्धतीने  केला.

शिर्डी त्यामुळे लाईव्ह ऐकणाºयांना हा सुखद धक्काच बसला. हा कार्यक्रम संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व गावागावात स्क्रीनवर प्रवरा संस्थेमार्फत दाखवण्यात आला. हा कार्यक्रम प्रत्यक्ष प्रवरानगर येथे होणार होता. मात्र कोरोणामुळे हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेण्याचा रद्द करण्यात येऊन व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आला.यावेळी सोशल डिस्टंन्स व मास्क वापरत कार्यक्रम झाला, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले की,.छत्रपती शिवाजी महाराज, वीर-विरांगण, कर्मयोग्यांची भूमी महाराष्ट्र भूमीला वंदन करतो. असे सांगत त्यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्राच्या विकासाला त्यांनी कसे समर्पित केले. 

याबाबत आत्मचरित्रातील ओळी उद्धृत करताना तेम्हणाले, ‘मी स्वत: सत्तेपासून व राजकारणापासून अलिप्त राहिलो नाही. मात्र समाजासाठीच राजकारण व सत्ता हे पथ्य मी कायम संभाळले’. राजकारण करताना समाजाचे प्रश्न सोडविण्यावर भर राहिला, असे मराठीतूनच त्यांनी सांगितले. सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्याच जातीची, किंवा धर्माची भटीक नाही. आतापर्यंत सगळ््या समाजाला जातीनिहाय पद दिले आहे. सहकारी अभियान निष्पक्ष आहे. त्याचा जातीशी संबंध नाही. सहकारी चळवळ ही सर्व वर्गाच्या कल्याणाची आहेस असे त्यांनी लिहिले आहे. असे मोदी यांनी मराठीतूनच सांगितले.

देह वेचावा कारणी हे नाव प्रासंगिक आहे. संत तुकाराम महाराज यांच्याच या पंक्ती आहेत. त्यांच्या जीवनाचे याच अभंगात सार आहे. असे गौरवपूर्ण भाषणात त्यांनी सांगितले. शेतीत कौशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही शेती करू शकत नाही, असे विखेंच्या शब्दात त्यांनी सांगितले. आत्मचरित्रातील अनेक दाखले देत त्यांनी मराठीतूनच सांगितले. प्रथम माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे यांच्या जीवन चरित्रावर आधारित या देह वेचावा कारणी या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन याबाबत माहिती विशद केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पद्मभूषण डॉक्टर  बाळासाहेब विखे पाटील यांच्या संबंधित अनुभवाविषयी काही घटनांची माहिती दिली तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे कार्य किती महान होते व त्यांनी दुष्काळी भागात पाणी येण्यासाठी सर्वपक्षीयांना धरून पाणी परिषद घेऊन हा प्रश्न सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे सांगितले.

तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.मुंबईतून व्हर्च्युअल पद्धतीने ते या कार्यक्रमात उपस्थित होते व त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की ,विखे कुटुंब हे  पूर्वीपासूनच समाज सेवेत आहे.पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे ही मुर्ती लहान पण किर्ती महान होती त्यांचे वागणे राहणे हे अगदी साधेपणाने होते मात्र त्यांची समाजसेवा व राजकारण चांगल्या पद्धतीने व समाज विकासाभिमुख होते. 

म्हणूनच या महान व्यक्तीला आम्ही  कोनड्यातुन कोदंणात  बसवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी या व्हर्च्युअल पद्धतीने या कार्यक्रमाचा लाभ घेतला, प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजय गाडगीळ सभागृहात जिल्ह्यातील खासदार आमदार पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती स्थानिक स्वराज्य संस्था विविध संस्थांचे पदाधिकारी पक्ष विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते हे  हे सामाजिक दूरचे अंतर ठेवून व कोरोणामुळे मोजक्या संख्येने मास्क लावुन उपस्थित होते.
close