shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझ्या हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही राज्यपालांवर उद्धव ठाकरे बरसले..!!


सावळीविहीर( प्रतिनिधी) :
महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना व श्रद्धा जपताना त्यांच्या आरोग्याची काळजी सरकार घेत असून मंदिरे उघडणे म्हणजे हिंदुत्ववादी व न उघडणे म्हणजे सेक्युलरवादी असा प्रश्न आपणास  का पडावा ? तसेच माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,असे रोखठोक सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांवर बरसले आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय।यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि,१२रोजी इंग्रजीत मंदिरा बाबद पत्र पाठवले होते, मात्र या पत्रावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  दिनांक 13 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवून या पत्रात म्हटले आहे की, आपण पाठवलेल्या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले आहे.

माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगवलाआहे, तसेच आपण  राज्यपाल पदाची शपथ घेताना घटनेतील सेक्युलरिझम नुसारच शपथ घेतली आहे .हेआपण विसरले आहेत .आपण मंदिरे उघडण्याचे पत्र मला दिले व त्यात म्हटले आहे की, मला अनेक राज्यातील शिष्टमंडळ भेटली ,त्यानुसार मी हे पत्र देत आहे, मात्र आपण मला दिलेल्या पत्रात संदर्भ म्हणून आपण जी 3 पत्र पाठवले आहेत, ते तिनही पत्र भाजपाचे आहेत, हा योगायोग म्हणायचा की काय? असे या पत्रात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना विचारले आहे व आपण जी मंदिरे उघडण्याचेब मला सूचना केली आहे ,त्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जोमाने सुरू आहे, राज्यातील प्रत्येक गावागावात आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, कर्मचारी सर्व घरोघर जाऊन कोरोनाची आरोग्य तपासणी ,उपचार व या संदर्भात विविध प्रयत्न करत आहेत, देशामध्ये एकमेव महाराष्ट्र राज्य कोरेणा बाबत मोठे काळजी घेत आहे, व राज्यातील मंदिरे उघडण्याचा सरकार प्रयत्न करेन,व जनतेच्याआरोग्यासाठीही  प्रयत्न करत राहणार आहे,असे म्हटले आहे.
close