shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"कोरोना सोबत जगताना .....माणसाची व्यथा........!!"

सध्याच्या संकटाच्या काळात माणसाचे जीवन म्हणून आरोग्याची काळजी ही आता सर्वात महत्वाची बाब ठरली आहे. कोरोना या विषाणू साथीच्या रोगाचे योग्य प्रकारे सामना मानव हा करत आहे.

कोरोंना सोबत जगताना माणूस आणि माणसाची व्यथा..! कस आहे ना ! बघता बघता डोळ्यासमोरील चित्रच बदलून गेले माणसाची व्यथा आणि कोरोना ने खूप काही शिकवलं...

डिसेंबर २०१९ मधे चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान मधे या आजाराची पहिली ओळख झाली.आणि त्या नंतर जागतिक पातळीवर या आजाराचा प्रसार झाला आणि या आजाराने जागतिक महामारीचे रूप घेतले. चीन या देशातून  झालेली या कोरोना विषाणू ची सुरवात बघता बघता भारत अमेरिका इटली अशा अनेक देशात या विषाणूचा प्रसार झाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)  च्या अहवालानुसार जागतिक आरोग्यासाठी असणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर इटली या देशाचे नाव असणारा हा देश आरोग्याचं विळख्यात सापडला. कित्येक लोक मृत्यमुखी पडले. ज्या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता. कधी कल्पना ही केली नव्हती. कधी मनातही आले नसेल. तसे अनेक दृश्य हे डोळ्या समोर येऊ लागले. नक्की हेच समजत नाही  की , चीनचे राजकरणातील डावपेच आखले आहे की संशोधनातील तत्व ज्ञान .....? 

कोरोना मुळे जागतिक पातळीवर झालेले परिणाम
१ अर्थ व्यवस्था
२ आरोग्य सेवा
३ शिक्षण व्यवस्था
४ मानवी जीवन
५ उद्योग - व्यवसाय
६ प्रत्येक   राज्यातील घटकाची अवस्था

२०२० साली महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. जनजीवनावर फार मोठा परिणाम झाला. महाराष्ट्रातील ग्रामीण विविध भागात शाहूवाडी, पन्हाळा, कागल, गडहिंग्लज,आजरा,शिरोळ, हातकणंगले.कोरोना ने शिरकाव केला आहे. गेल्या काही महिन्यापासून मंदी आणि या महामारी संकटामुळे ठप्प झालेले मानवी जीवन, उद्योग व्यवसाय, रोजंदारीवर काम करणारे कामगार, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शेतकरी, मध्यम वर्गीय कुटुंब , अल्पभूधारक, अनेकांचे उपजीविकेच साधने मार्ग बंद झाले. माणसाला आपले जसे जीवन महत्वाचे आहे. तसेच त्याचा उदरनिर्वाह देखील आहे. आरोग्याचा संकटातून च संपूर्ण जगासाठी एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना तसेच संघर्ष करावा लागत आहे.

 कोरोंना व्हायरसची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पासून आपण दररोज अनेक शब्द ऐकतो.

COVID - 19 श्वसन तंत्रात SARS- Cov 2 होणारे आजाराचे नाव आहे.

कोरो ना व्हायरस चे ४ प्रकार.

१) 229E.   अल्फा कोरोना व्हायरस.
२) NL63    अल्फा कोरोना व्हायरस.
३) O C43   बिटा कोरोना व्हायरस.
४)HKU       बिटा कोरोना व्हायरस.

1) SELF ISOLATION   : सेल्फ आयसोलेशन  म्हणजे कोणताही व्यक्तीला कोरोनाचे लक्षण आढळल्यास ती व्यक्ती स्वतःला घरात इतरांपासून वेगळे राहते.

2) SOCIAL DISTANCE : सोशल डीस्टन्स म्हणजे एकमेकांना सोबत बोलताना किंवा भेटताना एक मीटर पेक्षा अधिक अंतर ठेवणे.

3) EPIDEMIC    :इपिडेमिक म्हणजे एकाच आजारामुळे एका भागात किंवा क्षेत्रात मोठ्या संख्येने लोकांना त्या आजाराची लागण होते.

4) PANDEMIC : पॅंडेमिक म्हणजे एकच महामारी अनेक देशात पसरते त्यावेळी पॅंडेमिक असे बोलले जाते.

5) QUARNTINE : क्वारनटाईन म्हणजे  रुग्णाला समाजापासून वेगळे ठेवणे तसेच इतरांना भेटणे साठी प्रतिबंध घालणे.

6) LOCK DOWN :  लाॅकडाउन  म्हणजे  एकत्र काम न करणे, बाजार किंवा रस्त्यावर गाड्या चालवणेस प्रतिबंध करणे.

मानवाने कोरोना सोबत जगताना स्वतःची काळजी घेतलीच आहे. सुरुवातीला आपण खूप मानसिक तणाव मधे होतो. दैनदिन जीवन व्यतीत करत असताना मानसिक स्वास्थाला  पोषक ठरणारी बाबी , इच्छाशक्ती, सकारात्मक व नकारात्मक भावनांचा अनुभव व स्विकार व्यक्त केला. योग्य नियोजन करण्याची क्षमता ,मनोबल प्रती उचलेली जाणीवपूर्वक पावले आजूबाजूची परिस्थिती तसेच तणाव स्थितीवर यशस्वी पणे मात करू शकतो . हाच आपला आत्मविश्वास , स्वतःची कल्पना आपल्याला कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी बळ देते. या समस्येला सामोरे जाताना पोषक किंवा धोकादायक गोष्टींचा विचार करून पर्यायांची निवड करून घेतलेला निर्णय होय.

आपण सर्व ठीक असाल अशी अपेक्षा बाळगते. काळजी घ्या. सुरक्षित रहा. धन्यवाद!

नाव: प्रिया गणपत पोवार.
संशोधक विद्यार्थिनी ( राज्यशास्त्र विभाग)
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
मोबा .नो. 9673093206
E mail I'd : powarpriya953@gmail.com
हि पोस्ट जर कोणी कॉपी पेस्ट केले तर कारवाई करण्यात येईल.
close