shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जैसे पके हुए फलों को गिरने के सिवा कोई भय नही, वैसे ही पैदा हुए मनुष्य को मृत्यू के सिवा कोई भय नही...भारत ननवरे सर..!!

इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
कौठळी: दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी जि प प्राथमिक शाळा कौठळी या शाळेत वाल्मिकी ऋषी जयंती साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक नंदकुमार सुर्यवंशी यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रास्ताविक केले.नंतर शाळेचे उपशिक्षक भारत ननवरे सरांनी उपस्थितांना वाल्मिकी ऋषींची माहिती दिली.त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमा अंतर्गत वाल्मिकी ऋषींची माहिती मुलांच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर देखील पाठवण्यात आली.


या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, उपशिक्षक भारत ननवरे,आरती गायकवाड, अंगणवाडी सेविका राजश्री मोरे, शिलावती गायकवाड, सारिका पाटोळे हे उपस्थित होते.

आभार शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी मानले.कोविड- 19 चे सर्व नियम पाळून जयंती साजरी करण्यात आली.
close