केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:- शहरातील रहीवाशी तथा औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी बौद्धवासी दिपक रामराव घाडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम दि.१ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी बारा वाजता केज शहरातील फुलेनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.केज शहरातील फुले नगर येथील दिपक रामराव घाडगे हे औरंगाबाद येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांचे दि. ३० आँक्टोंबर २०१९ ला अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले होते.
त्यांच्या या दुख:द घटनेला एक वर्षाचा कालावधी होत असल्याने त्यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम दि.१ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी बारा वाजता केज येथील फुलेनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दिपक घाडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त घाडगे कुटुंबाने केज मतदार संघात गोरगरीब जनतेला शेतकरी वर्गाला लागू पडतील असे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याचे घाडगे परीवाराने ठरवले होते .
पण यावर्षी कोरोना या रोगराई मुळे हे सामाजिक कार्यक्रम करता येत नसल्याने हे सामाजिक कार्यक्रम रद्द करून एकदम साध्या पध्दतीने कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. कोरोना रोगाला टाळण्यासाठी सोसल डीस्टन्स पाळून हा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. असे घाडगे परीवाराने सांगितले आहे.
केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेनेच्या नेत्या सौ. डॉ. अंजलीताई घाडगे यांनी सदरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे नम्र अवाहन केले आहे.

