पुणे:-पुणे शहरात आज, गुरुवारी दिवसभरात नव्याने 411 रुग्ण आढळले असून आता कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ लागली आहे. आज 316 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 407 इतकी आल्यामुळे संसर्ग दर घटत आहे. विशेष म्हणजे दिवसभरात फक्त 7 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 1 रुग्ण पुण्याबाहेरील होता, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आत्तापर्यंत 1 लाख 65 हजार 837 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. एकूण 385 रुग्णांची स्थिती गंभीर असून 250 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
दरम्यान, शहर आणि उपनगरातील क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमे अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकांद्वारे केली जात आहे. तरीही नागरीकांनी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे.
तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या डॉक्टरकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

