shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईमंदिर उघडताच साई भक्तांबरोबरच देणगीचा ओघ सुरू! 500 नग फेस शील्ड भक्ताकडून संस्थानला अर्पण..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी) :
शिर्डीला श्री साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी खुले होताच साईभक्तांचे ही शिर्डीत येणे सुरू झाले असून दर्शनाला साई भक्त मोठ्या संख्येने येत आहेत. त्याचप्रमाणे देणगीही देत आहे. त्यामुळे श्री साईबाबा संस्थानला आता वेगवेगळ्या माध्यमातून देणगीचाही ओघ सुरू झाला आहे. असे दिसून येत आहे.

आज बुधवारी मध्यप्रदेशातील ग्वालियर येथिल साईभक्त भास्कर हेमराजाणी यांनी सुमारे 10 हजार रुपये किंमतीचे 500 नग फेस शिल्ड संस्थानला देणगी स्वरुपात दिले. सदरची देणगी स्विकारताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी 
श्री साईबाबा संस्थानचे मंदिर उघडल्यानंतर साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दर्शनासाठी येत।आहेत. 

दर्शन घेऊन श्री साईबाबांच्या चरणी देणगी वेगवेगळ्या प्रकारची अर्पण करीत आहेत.गेले आठ महिने श्री साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते.त्यामुळे देणगीचा ओघ  कमी झाला होता. मात्र आता हळूहळू येथे  देणगीचाही ओघ सुरू झाला असून देणगीचा श्री साईबाबा संस्थानला  वेग सुरू झाल्याने श्री साई संस्थान अधिकारी-कर्मचारी साईभक्त तसेच ग्रामस्थ व सर्वांमधून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.
close