shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी कोरोना चे सर्व नियम पाळत व तपासणी करत घेतले साई दर्शन..!!

सावळीविहीर(प्रतिनिधी) :
शासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या अटी व शर्ती पाळत व येथील संस्थान प्रशासनाने दिलेले नियम पाळत साईभक्त दर्शन घेत असल्याचे दिसून येत असून असेच पुढे साईभक्तांनी राहिले व माझे कुटुंब माझे जबाबदारी पाळली तर नक्कीच दुसरी कोरोणाची लाट येणार नाही व तशी साईबाबांना आपण सर्वजण मिळून प्रार्थनाही करू !असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना, गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डीत साई मंदिर उघडल्यानंतर प्रथमच श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येथे आज बुधवारी ना, गुलाबराव पाटील आले होते. त्यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते येथील संस्थांननी हाताळलेली परिस्थिती व सध्या साईभक्तांना देण्यात येणारी कोरोना संदर्भातली सुविधा यांचेही पाहणी केली. स्वतः तपासणी करून ते मंदिरात गेले, यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, दरवर्षी मी सहा महिन्यातून तरी श्री साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येत असतो. त्यामुळे मी श्री साई मंदिर उघडताच दर्शनाला आलो आहे. शासनाने मंदिरे खुली केली आता भक्तगण दर्शनाला जात आहेत. मात्र प्रत्येक भक्ताने सध्या श्रद्धे बरोबरच कोरोनाचे नियमाचेही पालन केले पाहिजे.शासनाने दिलेल्या सूचना तसेच संस्थान प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. 


शिर्डीत मला संस्थान प्रशासनने केलेले नियम व साईभक्त पाळत असलेले नियमांची अंमलबजावणी ही काटेकोर असल्याचे दिसून आले आहे. तरीही प्रत्येक नागरिकानी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" पाळली पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून साईबाबानाही प्रार्थना करुन कोरोणा संदर्भातल्या अटी व शर्तीचे नेहमी पालन करण्यांचे आवाहनही त्यांनी केले व स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी, नातेवाईक यांनाही कोरोना संदर्भातील शिस्त पाळण्याची प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
close