shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाचे नियम झुगारून केले घंटागाडीचे उद्घाटन नागरिक संतप्त..!!


चाकुर तालुका प्रतिनिधी( संजय माकणे):
चाकूर तालुक्यातील अलगरवाडी हे गाव आदर्श गाव म्हणून वाटचाल करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने गावामध्ये विना मास्क फिरणाऱ्या वर कायदेशीर कारवाई केली होती. दंड पण वसूल केला गेला. जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार अंतर्गत घंटागाडीचे वितरण करण्यात आले. कुठलेही नियम न पाळता घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी गावचे सरपंच गोविंद माकणे तसेच ग्रामसेवक व काही पत्रकार बंधु सुद्धा विनामास्क कार्यक्रमाला उपस्थित राहिले. गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उपस्थित झाली. मास्क सर्वसामान्यांसाठीच आहे का ? कार्यक्रमाला विना मास्क उपस्थित असणाऱ्यांना दंड लावण्यात यावा. अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
close