shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुनाळला बुध्द विहार मध्ये जागतिक विद्यार्थी दिन साजरा...!!

पुनाळ । प्रतिनिधी(सुरेश वडर) :
पुनाळ ता.(पन्हाळा)येथील बुध्द विहार मध्ये जय भिम तरुण मंडळ व शिव शाहू फुले आंबेडकर वाचनालय पुनाळ यांच्या वतीने जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.
        "विद्यार्थी दिन साजरा करताना कार्यकर्ते "

भारतीय घटनेचे शिल्पकार डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 7नोव्हेंबर1900रोजी सातारा येथील शिवराज विध्यालयात प्रवेश घेतलेला दिवस आहे. हा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. डाॕ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पन्हाळा तालुका प्रमुख सुरेश वडर, विजय पोवार यांनी केले. दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी बहुजन कार्यकत्यांनी मनोगते व्यक्त केलीत. 
      कार्यक्रमास संघर्ष बहुजन सेनेचे पन्हाळा तालुका उपाअध्यक्ष साताप्पा पोवार,कृष्णात पोवार,दिपक पोवार,मारुती पोवार,कृष्णात कांबळे ,पृथ्वीराज पोवार,वरद वडर आदी बहूजन कार्यकर्ते उपस्थित होते.
close