इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
पिठेवाडी:७/११/२०२० रोजी पिठेवाडी गावामध्ये रोटरी क्लब पुणे जिल्हा ३१३१ आणि रोटरी क्लब ऑफ वरकुटे यांच्या संयुक्त विद्यमाने व पिठेवाडी गावचे सुपुत्र रोटरी क्लबचे डिस्ट्रिक गव्हर्नर ज्ञानदेव डोंबाळे यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील शंभर कुटुंबांना प्रत्येकी अकरा प्रमाणे अकराशे रोपांचे वाटप करण्यात आले यामध्ये प्रमुख्याने आंबा चिकू नारळ पेरू सीताफळ रामफळ चिंच मोसंबी लिंबूनि कडीपत्ता या रोपांचा समावेश आहे भविष्यात या फळ झाडामुळे पिठेवाडी गावांमध्ये गावातील लोकांना मोफत सर्व प्रकारची फळे सहजपणे घरीच उपलब्ध होतील यामुळे रोगप्रतिकारक क्षमता तसेच गावाच्या नैसर्गिक सौंदर्य यामध्येसुद्धा भर पडणार आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डिस्ट्रिक गव्हर्नर ज्ञानदेव डोंबाळे व रोटरी क्लब ऑफ वरकुटे चे शशिकांत शेंडे सर व त्यांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाडे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपसरपंच गोरख मासाळ. विजय शेंबडे.बळीराम डोंबाळे .आगतराव वाघमोडे. प्रताप पोमणे.शहाजी वाघमोडे .सतीश डोंबाळे . किसन शेंबडे, सुरज पोमणे. यांनी आतिशय थोडक्या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी १०० लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती पिठेवाडी गावचे उपसरपंच गोरख मासाळ यांनी दिली.





