shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : स्वप्नील सावंत..!!

इंदापूर : प्रतिनिधी 

इंदापूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या शिष्टमंडळाने दि. ४ रोजी इंदापूर शहर व तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला दाद देत संबंधित विभागाने दि. ८ रोजी शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काँग्रेसच्या मागणीला यश आले असल्याचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी सांगितले.




याबाबत सविस्तर हकिकत अशी की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले होते. या खड्डयांमुळे  नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.काही ठिकाणी गंभीर स्वरुपाचे अपघातही घडले होते. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेत इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर गैरसोईचा पाढा वाचून, संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते व तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच संबंधित विभागाने खड्डे न बुजावल्यास आम्ही ते खड्डे बुजवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करु असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेवून  दि. ८  रोजी तातडीने शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. 


यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय सोडवला गेल्याने जनतेने इंदापूर काँग्रेस व संबंधित विभागाचे आभार मानले.या वेळी काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्वप्नील सावंत म्हणाले तसेचतालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांविषयी, अडी-अडचणी सोडविण्यासाठी तालुक्यात काँग्रेस सदैव सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असून तालुक्यात काँग्रेस सदैव कामे केले जात असून सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे मत तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी सांगितले.

close