shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शनि मंदिर सोमवार पासुन भाविकांसाठी झाले खुले...!!

शनिश्वर मंदिर परिसरात आनंदोत्सव..!

प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई :- जागतिक तिर्थक्षेञ असलेले शनिशिंगणापुर येथील शनिमंदिर आज सोमवार पासुन भाविकांसाठी खुले होणार असल्याचे शनैश्वर देवस्थानच्या वतीने जेष्ठ विश्वस्थ आदिनाथ शेटे यांनी सांगितले. जागतिक कोरोना महामारीमुळे 22 मार्च लाॅकडाऊन झाल्यापासुन शनिशिंगणापुर येथील शनिमंदिर बंद होते. या काळात फक्त दैनदिन पुजा अर्चा नियम पाळुन पुजारी करत होते.शनिवार दिवाळीची शनि आमावस्या पण भाविका विना सुनी सुनी गेली.फक्त महाद्वारावरूनच काही भाविक हात जोडुन दर्शन घेवुन जात होते.

पण महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सोमवार 16 नोव्हेंबर पासुन राज्यातील देवस्थान उघडे करण्याचा निर्णय मुख्यमंञी व राज्य मंञीमंडाळाने घेतला.यामुळे सोमवार  पासुन शनिशिंगणापुर येथील शनिमंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.शासनाच्या कोरोना नियमावली नुसार सोशल डिस्टन्स पाळून तोंडाला मास्क लावल्या शिवाय मंदिरात दर्शनाला सोडण्यात येणार नाही. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी गेटवर सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

शनैश्वर देवस्थानच्या वतीने दोन मशिन स्वच्छता करण्यासाठी आणण्यात आले असुन दर तासाला मंदिर परिसर हा सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात येणार असल्याचे शनैश्वर देवस्थानचे जेष्ठ विश्वस्थ आदिनाथ शेटे पाटील यांनी सांगितले.कोरोना महामारी मुळे येथील व्यावसाईकांचे पण मोठे नुकसान झाले होते. आता शनिमंदीर देवस्थान सुरू होत असल्याने व्यावसाईकांमध्ये पण आनंद, हर्षोल्लासाचे वातावरण असल्याचे दिसले.
close