shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वाधिक वयात आयपीएल खेळणारे क्रिकेटपटू..!!

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमियर लिग. ही जगातील सर्वात मोठी व ग्लॅमरस लिग स्पर्धा असून या स्पर्धेतून मिळणारा पैसा व प्रसिद्धी प्रत्येक खेळाडूला आकर्षित करते. त्यामुळे जगातल्या सर्व छोटया खेळाडूंचं आयपीएल खेळण्याचं स्पप्न असतं. आयपीएल मध्ये खेळण्यासाठी संबंधीत खेळाडूला टि -२० साठी  लागणारे क्रिकेटींग कौशल्य व तंदुरुस्ती सिध्द करावी लागते. सर्व साधारणपणे आयपीएलमध्ये १७ वर्षापुढील खेळाडू खेळतात. 

जेणे करून हे कमी वयाचे खेळाडू आपला अनुभव विकसीत करून आपापल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून दिर्घकाळ खेळू शकतात. त्यामुळे आयपीएलमध्ये ताज्या दमाच्या व तरुण रक्ताच्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिली जाते. तरीही काही जास्त वयाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले असून त्यांनी आपल्या शानदार कामगिरीने प्रेक्षकांसह सर्वांना प्रभावित केले आहे. तरीही आयपीएल मध्ये वयस्कर खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी दिली जात नाही.

भारतरत्न सचिन तेंडुलकर, रिकी पाँटींग, जॅक कॅलिस, एबी डिव्हीलर्स, शेन वॉटसन, महेंद्रसिंग धोनी सारखे नामांकित खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही आयपीएल मध्ये खेळले खरे परंतु त्यातील डिव्हीलर्स वगळता कोणीही आपल्या पूर्वीच्या खेळाचा ठसा उमटविण्यात यशस्वी झाले नाही.

 नव्या खेळाडूंबरोबरच जुने अनुभवी खेळाडू खेळल्याने नव्यांना त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळते व क्रिकेट रसिकांना नेत्रदिपक खेळाची मेजवाणी चाखायला मिळते. तसेच हे वरिष्ठ खेळाडू आयपीएल मध्ये खेळविण्याचे थांबवल्यानंतर मेंटॉर, कोच व तत्सम पदांवर राहून संबंधीत संघाशी जोडले जातात. त्याचा लाभ संबंधीत फ्रेंचाईजीला होतो.

काही असे खेळाडू आहेत की ज्यांनी वयाची चाळीसी गाठल्यानंतरही आपल्या लाजवाब खेळाडू आपल्या संघाला भरीव योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये काही खेळाडू फक्त एकाच संघाकडून खेळले असून त्यामध्ये शेवटपर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. अशाच तीन वरीष्ठ खेळाडूंची माहीती प्रस्तुत लेखात देत आहोत.

आयपीएल मध्ये खेळणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंच्या यादीत अग्रक्रमावर ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉगचे नाव अव्वल स्थानावर असून तो त्याचा शेवटचा सामना सन २०१६ च्या आयपीएल सत्रात गुजरात लायन्सकडून खेळला. त्यावेळी त्याचे वय ४५ व ९२ दिवस होते. त्या सामन्यात केकेआरचा संघ पराभूत झाला होता.

भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळायची कधीही संधी न मिळालेल्या मुंबईच्या फिरकी गोलंदाज प्रविण तांबेने वयाच्या ४४ वर्ष व २१९ व्या दिवशी आपला शेवटचा आयपीएल सामना सन २०१६ मध्येच गुजरात लायन्सकडून आरसीबी विरूध्द खेळला.  तांबे आयपीएल मध्ये एकूण ३३ सामने खेळला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा श्रीलंकेेचा ऑफस्पिन गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने आपला शेवटचा आयपीएल सामना वयाच्या ४२ वर्ष व ३५ व्या दिवशी आरसीबीकडून कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द ईडन गार्डन्ससवर खेळला. त्या सामन्यात त्याने २ षटकात १९ धावा दिल्या. त्यामध्ये त्याला एकही बळी मिळाला नाही. या सामन्यात आरसीबी केकेआरकडून ३० धावांनी पराभूत झाल्याने मुरलीधरनच्या समस्त यशस्वी कारकिर्दीचा अपयशाने शेवट झाला.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close