shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केली कोरोनातून सावरलेल्या कुटुंबीयांची दिवाळी गोड...!!


संगमनेर । प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप
किर्तनकार इंदुरीकर महाराज कोरोनातून सावरलेल्या कुटुंबीयांना करत आहेत मदत. ज्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती नव्हती. अशा कुटुंबियांना इंदुरीकर महाराजांनी दिवाळीचे फरसाण देऊन त्यांना मानसिक आधार देऊन त्यांची दिवाळी गोड केली. इंदुरीकर महाराज समाज प्रबोधनकार आहेत. 

महाराजांनी कपडे व फरसाण वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आणले. इंदुरीकर महाराजांनी समाज कल्याण करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा अडचणीच्या वेळेस आपला हात पुढे केला आहे.त्याच्या या कृतीशील कार्यामुळे  यावेळेस अनेक गोरगरिबांच्या डोळ्यातून अश्रू आले. इंदुरीकर महाराज हे नेहमी संकटाच्या वेळी समाज हितासाठी आपला हात नेहमी पुढे करत असतात. 

जर आपण तसे बघितलं तर हे काम जे आहे ते एखाद्या राजकीय पुढाऱ्यांचे काम आहे. पण हे काम इंदुरीकर महाराज विनासायास करत आहेत. इंदुरीकर महाराजांनी गोरगरिबांना फरसाण व कपडे वाटल्यामुळे अनेकांच्या चेहर्यावर दिवाळी पर्वावर हर्षोल्लास दिसत आहे.
close