इंदापूर ता.१५
साप्ताहिक शिर्डी एक्सप्रेस इंदापूर तालुका प्रतिनिधी तात्याराम पवार यांचे साप्ताहिकाचे व इंदापूर दीपक खिलारे यांच्या मानदेशी न्यूज या तेजस्विता या दिवाळी अंकाचे प्रकाशन भाग्यश्री बंगला येथे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रकाशन वेळी उपस्थित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे जिल्हा संपर्क प्रमुख व अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व दैनिक जनप्रवास तालुका प्रतिनिधी पत्रकार काकासाहेब मांढरे तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे इंदापूर तालुका सचिव व अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष व साप्ताहिक शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर , पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व ह्यूमन राइट्स जनहित मानवाअधिकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष , इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाचे इंदापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार कैलास पवार, श्रमिक पत्रकार संघटना पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक व विश्व वारकरी सेना पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार अाबासाहेब उगलमोगले. पत्रकार अहमद शेख ,आधार न्यूजचे पत्रकार जितेंद्र जाधव, दैनिक लोकप्रधान न्यूजचे इंदापूर तालुका प्रतिनिधी व श्रमिक पत्रकार संघ इंदापूर तालुका सरचिटणीस व सह संघटक पत्रकार इम्तियाज मुलानी , महाराष्ट्र ग्रामीण न्युज पत्रकार दीपक खिलारे ,आपला महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार श्रेयश नलवडे इत्यादींच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिर्डी एक्सप्रेस व न्यूज पोर्टल च्या बातम्या एक्सप्रेस असतात असे उद्गार काढले व मानदेशी न्यूज व महाराष्ट्र ग्रामीण न्युज पोर्टल व शिर्डी एक्सप्रेस यांच्या बातम्या सतत सामाजिक, राजकीय, कला, संस्कृती क्रीडा , नाट्य क्षेत्रातील घडामोडी रोखठोक, सडेतोड लिखाणामुळे जनतेपर्यंत पोहोचतात आणि त्याचा सुसंवाद घडतो आणि अनेक गोष्टीचा नागरिकांना, समाजाला त्याचा फायदा होतो.
दोन्ही शिर्डी एक्सप्रेस असेल मानदेशी न्यूज, महाराष्ट्र ग्रामीण न्यूज पोर्टल असेल यांचे प्रतिनिधी चांगल्या प्रकारचा काम इंदापूरमध्ये करत आहेत असेही ते म्हणाले आणि या साप्ताहिक शिर्डी एक्सप्रेस व मानदेशी न्युज तेजस्विता या अंकास शुभेच्छा दिल्या.

