shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवाळीमुळे केरसुनी उर्फ लक्ष्मी ,टोपले, सूप, खरेदीसाठी महिलांची लगबग..!!


सावळीविहीर( प्रतिनिधी) :
जसजशी दिवाळी जवळ येऊ लागली आहे. तसीतसी लक्ष्मी उर्फ केरसुनी ला मागणी वाढली आहे.बाजारात केरसुनी उर्फ लक्ष्मी विक्रीसाठी आता येत असून नागरिक केरसुनी बरोबर छोट्या केरसुनी खरेदी करत आहेत.कारण दीपावलीच्या दिवशी या केरसुनि उर्फ लक्ष्मीची ही पूजा केली जाते.

घराघरात केरसुनी ची पूजा करून धनसंपदा यांची पूजा करून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जात असते.त्यामुळे या केरसुणी, लक्ष्मीला सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र या केरसुनीचे भाव सध्या बाजारात वाढले आहेत.सध्या अनेक घरांमध्ये फरशी आली आहे. फरशी, स्टाईल मुळे केरसुनी जाऊन नवीन झाडू चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र तरीही दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या, वेळी केरसुणीची पूजा ही सर्व घराघरात केली जाते. त्यामुळे या केरसुणीला दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेला खूप महत्त्व आहे व ती घराघरात दीपावलीच्या निमित्ताने खरेदी केली जाते.

तिची पूजा केली जाते.त्यामुळे आता सध्या या केरसुनी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहेत, केरसुणीला काही ठिकाणी झाडू, फडा, लक्ष्मी, शिराई असे वेगवेगळे नावे आहेत. केरसुनी शिंदळीच्या झाडा पासून बनवली जाते. मात्र दिवसेंदिवस केरसुनी बनवणारे आता कमी होत आहेत. कारण दिवसाला 40 ते 50 केरसुनी बनवल्या जातात. मात्र त्यासाठी मोठी मेहनत अगोदर घ्यावी लागते, मात्र एवढी मेहनत घेऊन त्या तुलनेत केरसुणीला भाव मिळत नाही. 

त्यामुळे आता केरसुनी बनवण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. दीपावलीला लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून केरसुणीची पूजा केली जाते.  मात्र केरसुणी बनवणारे हात किंवा कुटुंब कितीही केरसुनी बनवल्या तरी त्यांचे जीवनमान गरिबीत ,अंधारातच जात आहे. वर्ष न वर्ष मोठी मेहनत घेऊन ही कला जोपासत केरसुनी बनवणारे कुटुंब आजही दारिद्र्यात आपले जीवन जगत आहे आणि घराघरात लक्ष्मी प्रसन्न व्हावी. लक्ष्मी यावी म्हणून केरसुणीची पूजा केली जाते, 

मात्र तीला जे हात बनवतात.जे कुटुंब बनवतात तेच मात्र वर्षानुवर्ष अंधारात आहेत.असेही दिसून येत आहे. तरीही आपली पिढीजात ,कला म्हणून अनेक कुटुंब आजही केरसुणी बनवत आहेत व बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. या केरसुनी बरोबरच बाजारात टोपले ,सूप आदी बाजारात विक्रीसाठी येत आहेत.कारण दीपावलीला या टोपली, सुप,  केरसुणीची पूजा करूनच त्यांचा वापर घरामध्ये सुरू होतो.असे अनेक घरे कुटुंबे आहेत की ते दीपावलीला या वस्तूंचा वापर नव्याने सुरू करतात. त्यामुळे या वस्तूंना बाजारात मागणी वाढते.या वस्तू म्हणजे लक्ष्मी आणणार ! म्हणून या वस्तू दिवाळीला ती महत्त्वाच्या समजल्या जातात, त्यामुळे दिवाळीला केरसुनी उर्फ लक्ष्मी यांची लक्ष्मीपूजनाला  पूजा केली जाते.

असे वयस्कर लोकं सांगतात. त्यामुळे सध्या बाजारात लक्ष्मी केरसुनी येत आहे व नागरिकही महिला उर्फ लक्ष्मी दिवाळीसाठी घेत आहेत. केरसुनी  बरोबर छोटी लक्ष्मी, छोटी केरसुनी ही घेताना दिसत आहे.असे चित्र प्रत्येक बाजारात सध्या दिसून येत आहे.
close