मुरूड ॥ प्रतिनिधी (विकास मेहेतर:):
मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील सरपंच नौशाद अब्दुल रजाक दळवी यांचे विरुद्ध समंत अविश्वास ठरावावर विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे साध्या बहुमताने अविश्वास प्रस्तावाला समंती आवश्यक असल्याने याकामी वरील आदेशनव्ये मुरुड तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार रविंद्र सानप यांची अध्याशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली 12 नोव्हेंबर2020 रोजी विशेष ग्रामसभेचे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी/उर्दू शाळेत आयोजन करण्यात आले आहे.
सदर ग्रामसभेत सकाळी ९ ते ११:२५पर्यंत ग्रामसभेस उपस्थिती नोंदविणे, सकाळी 11:30 वाजता विशेष ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्याचे येईल. तद्नंतर12 ऑक्टोबर 2020 रोजी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावबाबत सदस्य व सरपंच यांनी ग्रामसभेसमोर मत मांडणे, तद्नंतर विशेष ग्रामसभेच्या मान्यतेकरिता ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांचे गुप्त मतदान प्रकियेचे कामकाज करण्यात येईल, मतदान प्रकियेचे कामकाजानंतर अविश्वास ठराव संमतीबाबत झालेलं मतदानाची मतमोजणी करणे, तद्नंतर मतमोजणीचा निकाल जाहीर कार्नेव विशेष ग्रामसभेचा समारोप करणे आदी कामकाज करण्यात येईल.
सदर विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत बोर्ली सरपंच नौशाद दळवी यांचे विरुद्ध दिनांक 12 ऑक्टोबर2020 रोजी दाखल अविश्वास ठरावावर दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत बोर्ली सदस्य यांनी संमत केलेल्या अविश्वास प्रस्तावाला विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे संमती बाबतचीच कार्यवाही होईलव त्यानंतर गुप्त मतदान प्रकिया पार पडतील. त्याच ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्याची प्रकिया पार पडेल यांची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे कोव्हिडं 19चे अनुषंगाने प्रत्येकाने मास्क लावून येणे बंधनकारक राहील. कोव्हिडं 19चे अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी वेळेत उपस्थिय राहावे असे आव्हान बोर्ली ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी जी.के.म्हात्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

