केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक रंगात येत असून एकूण दाखल ५३ उमेदवारी अर्जा पैकी छानणी मध्ये ४५ उमेदवारी अर्ज वैध झाले असून ८ उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत.
यामध्ये भाजप व महा विकास अघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धारूर तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे महा विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे.
प्रा. ईश्वर मुंडे यांनी जिल्हा परिषद बीड अंतर्गत प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर २० वर्षे सेवा केलेली असल्याने त्या दरम्यान विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा यामुळे त्यांचा मराठवाडाभर चांगला जनसंपर्क आहे. तसेच ते ईश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक असून त्या अंतर्गत शाळा, कॉलेज व बालगृह चालू असल्याने मराठवाडयातील संस्थाचालक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व पालकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे.
साने गुरुजी सार्वजनीक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे मराठवाडयातील ग्रंथालय चालक व कर्मचारी यांच्याशीही त्यांचा चांगला संपर्क आहे.
एकंदर मराठवाडयातील सर्व जिल्हयात दांडगा जनसंपर्क व मोठया प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी केलेल्या प्रा.ईश्वर मुंडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व उमेदवाराला गांभीर्याने घ्यावे लागेल हे तितकेच खरे आहे.
आपण ज्या पक्षासाठी,नेत्यांसाठी तन मन धनाने जीव ओतून काम करतो त्यांच्या कडे उमेदवारीचा हट्ट धरणे किंवा निवडणूक अर्ज दाखल करणे म्हणजे बंडखोरी नव्हे तर केलेल्या कामाचा न्याय मागणे आहे.जर भाजप ने पसंती क्रमांक दोन चा उमेदवार घोषीत केला तर महाविकास आघाडीकडून माझा विचार व्हावा.प्रा.ईश्वर मुंडे, तालुकाध्यक्ष, रा. काँ. पा. ता. धारूरऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार दि. १७ / ११ / २०२० पर्यंतचा अवधी असल्याने निवडणूकीचे खरे चिञ पहाण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

