shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाल्याबद्दल.कृष्ण प्रकाश जी यांचे अंकिताताई पाटील यांनी केले अभिनंदन...!!


इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर: ५/११/२०२०. पिंपरी चिंचवड येथे (दि.४) आयपीएस अधिकारी ते आयर्नमॅन, अल्ट्रामॅनचा किताब पटकाविलेले मा.कृष्ण प्रकाश जी यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व  ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथील युवक कार्यकर्त्यांच्या समवेत भेट घेतली व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.


यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील तरुण कार्यकर्त्यांच्या  व युवकांच्या संदर्भातील विषयांवरती त्यांनी आयुक्ता समवेत चर्चा करण्यात आली व पोलीस यंत्रणेमार्फत युवकांना मदत व्हावी यासंदर्भातील ही विनंती  त्यांनी केली.
 

तसेच यावेळीआयुक्त कृष्ण प्रकाशजी म्हणाले की
युवकांनी सामाजिक जीवनात पुढाकार घेत पोलिसांसोबत येऊन पोलीस मित्र होऊन पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हे संपवण्यासाठी मदत करावी असे आव्हान यावेळी पोलिस आयुक्त मा.कृष्ण प्रकाश यांनी केले.

यावेळी पिंपरी चिंचवड येथील तरुण युवक कार्यकर्ते उपस्थित होते अंकिता ताई पाटील यांच्या कृतिशील कार्यक्षम व सर्वांना सामावून घेणारे कार्य हे जनतेमध्ये कौतुकाचा वर्षाव निर्माण करणारे दिसत आहे
close