shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करूले शिवारात विहिरीत उडी घेऊन शेतकर्याची आत्महत्या..!!

संगमनेर। प्रतिनिधी: तालुक्यातील करुले शिवारात ४-११-२० ला पहाटेच्या सुमारे विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. 

दिलीप अर्जुन कोल्हे, राहणार करुले, तालुका संगमनेर वय वर्ष ४८, असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.  दिनांक, ४-११-२० पहाटेपासून घरातून बाहेर पडले होते त्यांनी स्वतःचे विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. दिलीप कोल्हे, हे दुपारी १२ वाजेपर्यंत दिसून न आल्यामुळे  त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

दरम्यान त्यांचा मृतदेह त्यांच्याच विहिरीत आढळून आला. गावचे पोलीस पाटील, अशोक कोल्हे, माझी कार्यकर्ते, सुनील उकिरडे, विजय कोल्हे,तसेच स्थानिक रहिवाशांनी विहिरीतून मृतदेह काढण्यास पोलिसांना मदत केली.  त्यानंतर सदर मृतदेह तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविले . याप्रकरणी मयता चा भाऊ सतीश अर्जुन कोल्हे, यांनी पोलिसांत खबर दिली त्यानंतर संगमनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली.

आत्महत्या केलेले शेतकरी दिलीप कोल्हे यांच्यावर फायनान्स कर्ज होते व त्या शिवाय दूध धंद्यासाठी सुद्धा त्यांनी कर्ज उचलले होते. शेतातील ना पिके व दूध धंद्यातील घाटा व कर्जबाजारीपण यास कंटाळून दिलीप कोल्हे यांनी स्वता:च्याच विहिरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली.
close