shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यानंद सहकारी बँकेच्या सोनेतारण कर्ज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद..!!

इंदापूर,अकलूज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर या भागातील ग्राहकांना मिळाला दिलासा,यापुढे चालू राहणार ही योजना.



इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर: दि. ०५/११/ २०२० इंदापूर येथील विद्यानंद सहकारी बँकेने अतिवृष्टी काळानंतर इंदापूर,अकलूज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर येथील शाखांच्या वतीने सोने तारण कर्ज महामेळावा चे आयोजन केले आले आहे या द्वारे सामान्य ग्राहकांना कोरोना ची भीषण परिस्थिती व अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या लोकांच्या साठी सामाजिक जाणीव लक्षात घेऊन सर्व ग्राहकांना सोने तारण १४% वरून तब्बल 4 टक्के कपात करून अगदी १० मिनिटात १०% मध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे त्यास प्रतिसाद मिळत आहे.




इतर आर्थिक स्तोत्र तसेच फायनान्स ग्राहकांना सोने तारण मध्ये ज्यादा व्याजदराने कर्जपुरवठा करीत असतात परंतु कोरोना सारखी परस्थिती पाहता हे संकट मर्यादित नसून जगावर आलेले संकट आहे हे लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने हा सकारात्मक निर्णय घेतला होता.

इंदापूर,अकलूज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर तालुक्याची अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन सर्वसामान्य ग्राहक केंद्रबिंदू मानून विद्यानंद बँकेने या ठिकाणच्या शाखेत झटपट सोने तारण कर्ज अगदी अल्प दरात म्हणजे १०% व्याज दरात सुरू केले आहे यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे या योजनेद्वारे ग्राहकांना १ लाखास दरमहा फक्त ८३० रुपये व्याज द्यावे लागणार असून जे इतर आर्थिक स्तोत्र व फायनान्स पेक्षा कित्येक पटीने कमी आहे . इंदापूर,अकलूज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर येथील ग्राहकांनी या योजनेचा चांगला लाभ घेतला आहे,व यापुढेही ही योजना चालूच राहणार अशी माहिती बँकेचे अधिकारी श्रीयश नलवडे यांनी दिली.


अतिवृष्टी व कोरोनाच्या संकटात ग्राहकांना कमी व्याजदर करून दिलासा दिल्याबद्दल इंदापूर,अकलूज,नातेपुते,फलटण,पंढरपूर,सोलापूर येथील ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.
close