इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर दि. १६ नोव्हेंबर २०२० इंदापुर मध्ये टीव्हीएस होंडा शोरूम नाजीक या ठिकाणी बळीराम पेटकर व सहपरिवार यांच्या पेटकर सायकल्स अँड विघ्नहर्ता टॉईज उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्वतः खेळणी खरेदी करून ग्राहक म्हणून उद्घाटन केले.
दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्याने पेटकर परिवार पेटकर वस्ती माळवाडी यांनी लहान मुलांच्या खेळणी सायकल इंदापूर परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध झाले पाहिजे तसेच असा व्यवसाय उत्तम रित्या जनतेच्या सेवेसाठी उभा करण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. यावेळी शुभेच्छापर भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले की पेटकर परिवारा मार्फत या व्यवसायाचे उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला असून येथे जमलेल्या सर्व मान्यवर त्यांचे स्वागत करून म्हणाले की आपण सर्व जण शेतकरी आहोत कुठेतरी वेगवेगळ्या स्वरूपातील व्यवसाय करणे गरजेचे आहे .
लोकांची गरज ओळखून पेटकर परिवार यांनी हा व्यवसाय निवडला पेटकर आपण नक्कीच हुशार आहात तुमचा व्यवसाय यशस्वी व भरभराटीचा जावो पुढे बोलताना म्हणाले की पेटकर तुमच्या मामा बरोबर हा मामा तुमच्या बरोबर आहे .आयुष्यात प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी आणि व्यवसाय करावा लागतो प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला त्रास होतो.
त्यांना अनेक काटे चिखलातून जावे लागते परंतु खचून न जाता अडचणीवर मात करून पुढे चालायचे असते प्रामाणिकपणे राहिल्यानंतर अडचणी येत नाहीत तुमच्या आयुष्यात पुढे तुम्हीभविष्यात खूप मोठे व्हावे येथे असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी पेटकर यांना सहकार्य करावे माझ्या वतीने ही संपूर्ण सहकार्य राहील असे मनोगत व्यक्त करून पेटकर परिवारास शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवर पेटकर कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यास आले होते सर्व मान्यवर यांना एक झाड भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच
या कार्यक्रमास सर्व सामाजिक राजकीय मान्यवर यांनी भेट देऊन पेटकर परिवार यांना या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

