shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे श्रीनाथ मशनरी अँड हार्डवेअर या नवीन व्यवसायाचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न..!!

इंदापूर प्रतिनिधी
वडापुरी: दि.१६ नोव्हेंबर २०२०
श्रीनाथ मशनरी अँड हार्डवेअर या नवीन व्यवसायाचे वडापुरी गावामध्ये आज उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

श्रीनाथ मशनरी अँड हार्डवेअर याचे नानासाहेब घळके अवसरी यांनी हर्षवर्धन पाटील व राजकुमार पाटील आणि  अनेक मान्यवर यांचा सत्कार संपन्न केला .यावेळी बोरगावचे राजकुमार पाटील ,दत्तात्रेय शिर्के ,हनुमंत जगताप उर्फ तोबरे,  सरपंच संगीता तरंगे तसेच सरपंच संजय शिंदे ,श्रीमंत शिंदे, दत्तात्रय शिंदे ,बापू चंदनशिवे ,नगरचे डीवायएसपी अजित हगवणे, विकास कदम ,अरुण सिंगटे शिवाजी शिंदे  बबन फरतडे दत्तात्रय मगर इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उद्घाटन समारंभ प्रसंगी  मनोगत व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की श्रीनाथ मशनरी अँड हार्डवेअर या नवीन व्यवसायाचे नानासाहेब घळके अवसरी यांनी त्यांच्या पुतण्याला हा व्यवसाय करण्यासाठी उभारणी केली आहे. या व्यवसायातून वडापुरी परिसरातील सर्वांना त्यांच्या उपयोगी वस्तूंचे याठिकाणी मिळतील असे नियोजनात्मक हा व्यवसाय सुरु केला आहे तसेच वडापुरी गावामध्ये युवकांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत असून युवकांनी जास्तीत जास्त छोट्या-मोठ्या व्यवसाय सुरू करून नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उत्तम रित्या करावा. सर्वांनी सहकार्य केले तर चांगल्या पद्धतीचा व्यवसाय उभा राहू शकतो आपल्या परिसरात लागणाऱ्या या गरजा भागू शकतात. तसेच यावेळी पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी निरा भिमा सहकारी साखर कारखाना याचे आज आनंद वाटतो की एक लाख २१ हजार मेट्रिक टन एवढा ऊस गाळप झाला असून चार हजार टनाचा कारखाना साडेचार हजार टनाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम परफॉर्मन्स ने चालतो कामगाराचा सगळा पगार व बोनस सर्वांना दिला असून पहिला ऍडव्हान्स दोन हजार प्रमाणे देत असून एफ आर पी आपली २४०० ते २५०० किंवा त्यापेक्षा पुढे जाईल त्याच्या पैकी एक रक्कम आज काही देऊ शकणार नाही चार दिवसांमध्ये काल पंधरा तारखे पर्यंत तुम्ही ज्यांनी ऊस घातला असेल त्यांचे तीस तारखेला दोन हजार रुपये प्रमाणे पहिले एडवांस पेमेंट आपल्या खात्यामध्ये जमा केले जाईल कर्मयोगी साखर कारखान्याचे आपण सभासद आहात मी त्या कारखान्याचे चेअरमन म्हणून काम करीत असताना गेली चार-पाच महिने आम्ही खूप कडक शिस्त लावली नाराजी वाढली परंतु जे काम करीत नव्हते त्यांना थोडे शासन करावे लागले त्याला इलाज नव्हता शेवटी शेतकऱ्याच्या मालकीची संस्था आहे शिस्त पाळली नाही तर सिस्टीमने आपण गेलो नाही तर मग आपल्या संस्था चालू शकणार नाहीत या संस्थेवर आपले उपजीविकेचे साधन आहे म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की कर्मयोगी साखर कारखान्याचे पावणेदोन लाख टनाचे गाळप झालेले आहे आणि ९००० टनाने आपला कारखाना चालतो तेथील ही  आम्ही एफ आर पी चे पेमेंट दिले दोन हजार प्रमाणे तेथील एडवांस पेमेंट झालेले आहे. कालच्या दिवाळीला दोन्ही कारखान्याचे मिळून ४८ कोटीचे पेमेंट बाजारामध्ये आले .


त्यामुळे इंदापूरची बाजारपेठ भरली कै शंकरराव भाऊ यांनी आपल्याला जी शिकवण दिली त्या पद्धतीने आपण काम करतो संस्था म्हणजे चढ-उतार असतात कुटुंब प्रमुख म्हणून घरातला कर्ता माणूस असतो रोज कुटुंबामध्ये चढती कमान असते कधी त्या कुटुंबावर संकट येते कुटुंब प्रमुख कधी डगमगत नाही कधी चांगली प्रगती होती म्हणून हुरळून जात नाही. तशी परिस्थिती तालुक्याचा कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या सर्वांची असते म्हणून योग्य पद्धतीने चांगल्या प्रकारचे संस्कार घडवून नव्या पिढीला उत्तम प्रकारचे मार्गदर्शन करणे हे इंदापूर तालुक्याचे वैभव आहे, ते वैभव निश्चितपणे पुढे नेण्याचे काम आपल्या सर्वांच्या सहकार्यातून करतो. राजकारणामध्ये समाज कारणांमध्ये सत्तेतून माणसे मोठी होत नाहीत कामातून आणि समाजातून मोठी होतात सत्ता येईल जाईल सहा वर्ष झाली आपण सत्तेत नाही परंतु असा एकही दिवस नाही की त्याची आठवण झाली कारण कायमच आपण लोकात असणारी माणसे आहोत माणसा मध्ये काम करणारा माणूस हा सत्तेसाठी काम करीत नाही तर तो जनतेसाठी काम करतो त्यासाठी आपल्याला पुढे वाटचाल करायची येणाऱ्या भविष्यकाळ निश्चिंतपणे आपल्या सर्वांना उज्वल राहील अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो कोरोना जन्य परिस्थिती मध्ये आपण सर्वांनी सोशल डिस्टंसिंग मास्क वापरणे विनाकारण घराबाहेर पडू नये आपलं संरक्षण आपलं रक्षण आपल्याला करावे लागणार आहे अशा पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य करावे तेवढे अपेक्षा व्यक्त करतो व नानासो घळके यांच्या या उद्योगात सर्वांनी सहकार्य करून त्यांच्या उद्योगाची भरभराट व्हावे अशा पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी आपले मत व्यक्त केले .
close