स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा वापर करून समाजामध्ये अंधश्रद्धा पसरून लोकांची आर्थिक फसवणूक करणे तसेच महाराजांच्या प्रतिमेस व मुर्तीस श्री स्वरूपाचा अलंकार करून साडी चोळी असा पेहराव करून त्याची प्रतिमा कलुषित करण्याचे काम काही समाजकंटक वारंवार प्रसिद्धी माध्यमाद्वारे करीत आहेत ह्यावर सरकारने निर्बंध आणावेत या गोष्टी थांबवाव्यात असे सरकारला आव्हान वैभव भारती यांनी केले.
इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर: दीं.३/११/२०२०.अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज व मी त्यांचा थेट सातवा वंशज असल्याबाबत मान्यता मिळावी असा दावा श्री वैभव रतन भारती गोसावी राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी सोलापूर जिल्हा न्यायालय मध्ये दिनांक ११/९/२०१८ रोजी सोलापूर येथील दिवानी न्यायालयात केला आहे .
असे वैभव भारती यांनी प्रेस नोट द्वारे माहिती दिली व ते पुढे माहिती देताना म्हणाले की,ते स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज कथा चंचल भारती यांचे थेट सातवे वंशज असल्याचा जाहीर ठराव होण्याचा आदेश मिळवण्यासाठी त्यांचे वकील हेमंत ज्ञानदेव होळकर बारामती यांच्यामार्फत दावा दाखल केला आहे यामध्ये त्यांनी मुख्य सचिव मंत्रालय मुंबई .श्री वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट अक्कलकोट धार्मिक प्रकाशन संस्था 173 गिरगाव रोड गिरगाव, अनमोल प्रकाशन 683 बुधवार पेठ अप्पा बळवंत चौक पुणे. यांना प्रतिवादी केले आहे सदर प्रतिवादी तीन व चार या प्रकाशन संस्थांनी अनुक्रमे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आद्य बकर तसेच श्री स्वामी समर्थ हे ग्रंथ प्रकाशित केले आहे या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जन्म शुन्य होते ते संन्याशी ब्रह्मचारी होते ब्राह्मण जातीची असावेत.
ते कर्दळीवनातून प्रकट झाले होते वगैरे खोटं असा मजकूर लिहिला आहे त्यातून श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचे आई-वडील त्यांचे कुटुंब आणि वंशजांचा अपमान झाल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच हा मजकूर आमच्या पूर्वजांच्या व आमच्या स्वतःच्या चारित्र्याची व सामाजिक स्थानाची निगडित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे मी ते स्वामी समर्थ महाराज यांचे थेट वंशज असल्याचा जाहीर ठराव करून मागितला आहे तसेच प्रतिवादी आदींच्या परवानगीशिवाय श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा मूर्तीचा व सामाजिक स्थळाचा वापर करू नये यासाठी दाव्यांमध्ये मनाईहुकूम मागितला आहे दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक मोडी लिपीतील ऐतिहासिक पत्रे वंशावळ जमिनीची कागदपत्रे न्यायला साठी लागणारे इतर सक्षम पुरावे जोडले आहेत सदरचा दावा प्रलंबित असून कोर्ट कामकाज सुरू आहे परंतु वरील महाराजांच्या नावाने अंधश्रद्धा पसरवणे तसेच महाराजांच्या मूर्तीला साडीचोळी घालने व लोकांची आर्थिक फसवणूक करणे व प्रसारमाध्यमातून वर्तमानपत्रातून सोशल मीडिया इलेक्ट्रिक मीडिया व पुस्तके यातून वेळोवेळी महाराजांची माहित नसलेली माहिती समाजासमोर लोकांसमोर प्रसारित करणे हे अद्यापही चालू आहे त्यामुळे माझ्या कॅरेक्टरची समाजामध्ये वेळोवेळी प्रतिमा मलीन करण्याचे काम हे समाजकंटक करत असून भोळ्या भावड्या भाविकांची आर्थिक फसवणूक करत आहेत माझा फक्त एकच उदात्त प्रमाण आहे प्रसारमाध्यमांनी महाराजांची बदनामी थांबवावी व महाराजांचे वंशज देखील अस्तित्वात आहेत हे लोकांना समजावे यासाठी प्रश्न द्वारे ही माहिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे यांचा फक्त एकच येतो आहे हे सत्य महाराजांचे वास्तव लोकांसमोर यावी मायबाप सरकारने ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन त्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे महाराजांचा असा खोटा प्रचार करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणावे बंदी आणावी व सरकारने अशा समाजकंटकांवर व प्रसार माध्यमावर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती असे मनोगत त्यांनी व्यक्त केले तसेच यावेळी वडापुरी गावचे श्री भैरवनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष हनुमंत जगताप उर्फ तोबरे अण्णा यांनी सदर वैभव रतन भारती (गोसावी) यांचे हे म्हणणे पुराव्यानिशी असून त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे असे यावेळी स्पष्ट केले. यावेळी मंगेश देवकर हे उपस्थित होते.

