shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नरसिंहपूर विकास आराखड्यातील उर्वरित मंजूर निधी वितरित करावा -हर्षवर्धन पाटील..!!


इंदापूर:प्रतिनिधी दि.3/11/20
 श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील विकास आराखड्यातील उर्वरित मंजूर निधी त्वरित वितरित करण्यात यावा, अशी मागणी  सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
  

क्षेत्र निरा नरसिंहपूर विकास आराखडयासाठी  सन 2016 साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रू. 260.67 कोटींचा निधी मंजुर केला, त्यापैकी रू. 217.73 कोटीची प्रशासकिय मान्यता देण्यात आलेली आहे, ती कामे प्रगतीपथावर आहेत.प्रशासकीय मान्यतेपैकी रू. 126.67 कोटी निधी प्रत्यक्ष कामासाठी प्राप्त झाला असून सदर निधीपैकी 120.89 कोटी निधी विकास कामासाठी खर्च झाला आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
     

पुरातत्व खात्याकडील रू. 4.23 कोटी निधी उपलब्ध झाला असून पैकी रू. 1.25 कोटी निधी विकास कामासाठी खर्च झाला आहे. उर्वरीत रू. 26.73 केाटींच्या कामांची अंदाजपत्रके बनवणे, तांत्रिक मान्यता घेण्याची प्रक्रिया अंतिम स्तरावर आहे. सन 2020-21 या चालू आर्थिक वर्षात प्रशासकिय मान्यता दिलेल्या कामांकरीता व प्रगतीपथावरील विकास कामांकरीता रू. 89.40 कोटींची आवश्यकता आहे.
    



सार्वजनिक बांधकाम विभागान्वये सन. 2019-20 साठी रू. 48.79 कोटी व  सन 2020-21 साठी रू. 28.48 कोटी या प्रमाणे एकुण रू. 77.28. कोटींची मागणी मा. जिल्हा नियोजन अधिकारी, पुणे यांच्याकडे केली आहे. पैकी ठेकेदारांच्या प्रलंबीत देयकासाठी रू. 36.25 कोटी व प्रगतीपथावरील कामासाठी रू. 15.89 कोटी या प्रमाणे एकुण रू. 52.14 कोटीची तातडीची आवश्यकता असल्याने सदर निधी लवकर प्राप्त झाल्यास नियोजित कालावधीत विकास कामे मार्गी लागतील.तरी सदर बाबतीत संबधीत आधिका-यांना योग्य त्या सुचना देऊन तातडीची आवश्यकता असलेला निधी व उर्वरित प्रशासकिय मान्यताप्राप्त निधी उपलब्ध करून देणेत यावा, अशी मागणी या  पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. 
_________________________
close