shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्ल्ड पार्लमेंटच्या माहिती पुस्तिकेचे उपनगराध्यक्ष करणदादा ससाणेंच्या हस्ते प्रकाशन..!!

श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या माहीती पुस्तिकेचे प्रकाशन श्रीरामपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डब्ल्यूसीपीएचे नॅशनल मिडीया को -ऑर्डीनेटर तथा महाराष्ट्र (श्रीरामपूर चॅप्टर ) चे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे हे उपस्थित होते.

वर्ल्ड पार्लमेंट समाजाच्या विविध क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करत असून त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून सामाजिक प्रबोधन व सामाजिक एकता राखण्याचा जो उपक्रम राबविण्यात येत आहेत ते नक्कीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे यांनी व्यक्त केले.

सदर पुस्तिकेत जागतिक शांतते प्रति डब्ल्यूसीपीएची असलेली बांधीलकी, विश्वस्तरीय मुल्यमापन, पृथ्वी संस्था, संविधानचे महत्व, डब्ल्यूसीपीएची वार्षिक संमेलने, ऐतिहासीक क्षणचित्रे, सेमिनार व संमेलनांविषयी माहिती उपलब्ध आहे.
close