देवळाली प्रवरा: देवळाली प्रवरा येथील न्यु इंग्लिश स्कुल शाळेत व कॅम्पस मध्ये येणार्याच सर्व शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचार्यांची कोव्हीड – १९ साठी RTPCR चाचणी शिबीर घेण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दि. २३ नोव्हेंबर पासुन इ. ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्या वर्गांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांबची कोव्हिड – १९ संबंधीत अत्यंत विश्वासहार्य मानली जाणारी RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने संबंधीत विभागांना आदेश देऊन सदर चाचणी प्रक्रिया सुरु केली. परंतु मा. जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेऊन शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन केंद्रशासन प्रमाणित प्रयोगशाळांमधून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यां च्या चाचण्या घ्याव्यात असे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देऊन देवळाली प्रवरा येथील न्यु इंग्लिश स्कुल मध्ये शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गायत्री ज्यु. कॉलेज व गायत्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सर्व संबंधीत स्टाफची चाचणी शाळेतच घेण्यात आली.
याप्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. गिता राऊत यांनी माहिती दिली की या सर्व चाचण्या संस्थेद्वारे करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे संपुर्ण शाळा परिसराचे सोडिअम हायपोक्लोराईट फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शाळेत इन्फ्रारेड थर्मल मापक, वॉशबेसीन, निर्जंतुकिकरण कक्ष, सॅनेटायझर फुट डिस्पेन्सर, ऑक्सिमीटर इत्यादी सर्व तयारी पूर्ण झाली असून आम्ही विद्यालय सुरु करण्यास सज्ज आहोत. त्यानुसार पालकांना विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. सतिश राऊत, प्रा. भोसले सर, प्रा. सोनवणे सर यांनी सुध्दा चाचणी शिबिरात भाग घेतला.

