shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गरुड माता..!!

गरुड मादी जोडीदार निवडतांना नराची परीक्षा घेते. जसेकी जुन्या काळात वरसंशोधन व्हावे. गरुड मादी उपवर झाली की नर गरुड घिरट्या घालायला लागतात. गरुड मादीला नराची गरज असतेच. पण गरज आहे म्हणून ती कुठल्या लेचापेचा नराची निवड करत नाही. ती अगोदर नराची परीक्षा घेते. ..
गरुडाचे निवास्थान उंच डोंगरकपारीत असते. मादी गरुड एक काटकी उंचावरून खाली सोडते. नर गरुडाला ती काटकी जमिनीवर पडू न देता, हवेतच पकडायची असते. जसे त्याच्या पायातले भक्ष निसटल्यावर त्याला पुन्हा पकडावे लागते. अश्या प्रकारे दोनतीन वेळा मादी गरुड नराची परीक्षा घेते. परीक्षेत उतरलेला नर तिचा जोडीदार होतो. .
नराची घेतलेली परीक्षा पुढे मादी गरुडाला उपयोगात आणायची असते. गरुडाला पिल्ल होतात. जन्माला आलेल्या पिल्लांनी जगात टिकून राहवे. त्यांची गरुड म्हणून अोळख असावी. यासाठी गरुड माता त्यांना परिपक्व करण्यासाठी तयार करत असते. ती पिल्लांना उंच डोंगरावर असणार्‍या तिच्या घरट्यातून खाली फेकून देते. जसे नराची परीक्षा घेतांना तिने काटकी फेकून दिली होती. आता खाली फेकलेल्या पिल्लाचा बाप असणार्‍या नराला ते पिल्लू जमिनीवर पडण्या अगोदर त्याला हवेतच पकडायचे असते. घरट्यातून खाली फेकल्यावर ते पिल्लू स्वत:हून उडत नाही. तो पर्यंत गरुड माता त्याला खाली फेकत असते. आणि पिल्लू जमिनीवर पडू न देता नराला हवेतच झेलायचे असते. गरुड मातेचा हा संदर्भ मला खूप आवडला. पिल्लाला उंच उडता यावे, अन्न मिळवता यावे. यासाठी माता मेहनत घेत असते. फक्त जन्म देऊन सोडून देत नाही. पिल्लास जगण्या लायक बनवते. .

प्रत्येक मातेला अपत्य संवर्धनाची शक्ती निसर्गदत्त असते.
close