shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवक काँग्रेसने वालचंदनगर ते बावडा बस सेवा चालू करण्याची केली इंदापूर अगार प्रमुख यांना मागणी..!!

इंदापूर । प्रतिनिधी
इंदापूर: २१ नोव्हेंबर २०२०.इंदापूर तालुक्यातील  महत्वाची गावे असणारे वालचंदनगर व बावडा या गावांमधील वाहतूक हि प्रामुख्याने बसच्या माध्यमातून होत असते.  कॉरोना काळात येथील बस सेवा विस्कळीत झाली होती. 

 
परंतु आता  सर्वत्र लॉक डावून नंतर जणजीवन  सुरळीत होत असताना .  वालचंदनगर ते बावडा या मार्गावरची बस सेवा चालू होऊन प्रवाशांना याची  व्यवस्था होणे गरजेचे आहे. ही  बससेवा चालू व्हावी म्हणून आज युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास पाटील व चेतन कोराटकर आणि कार्यकर्ते यांनी इंदापूर अगार प्रमुख  मेहबूब मणेर  यांची भेट घेऊन वालचंदनगर ते बावडा एस टी बस सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी या साठी निवेदन देण्यात आले . 

यावेळी इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी देखील अगार प्रमुखांशी फोन वर चर्चा करून  बस चालू करण्याची विनंती केली . 
    
या वेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या पद्धधिकाऱ्यांसाहित इंदापूर शहर युवक काँग्रेसचे सचिव सुफियानखान जमादार , शहर युवक काँग्रेस सरचिटणीस संदीप शिंदे , घनश्याम निंबाळकर (क्रांतीसुर्य सामाजिक संघटना उपाध्यक्ष) निलेश सोनटक्के,सागर गायकवाड, आदी उपस्तिथ होते.
close