shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवणार--- प्रा.ईश्वर मुंडे ..!!

केज  । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :- 
मराठवाडा विभाग हा सदैव दुर्लक्षीत राहीलेला विभाग आहे. सततचा कोरडा किंवा ओला दुष्काळ, औद्योगीक क्षेत्रातील मागासलेपण यामुळे या विभागातील जनतेचे आर्थिक मागासले पण त्यांच्या  पाचवीलाच पुजलेले आहे. मराठवाडयासह महाराष्ट्रात पदवीधर युवकांच्या व शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. 
        

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना  फक्त स्वप्न दाखवून त्यांची घोर निराशा केलेली आहे.पदवीधर युवक -युवती, शिक्षण क्षेञ, सार्वजनीक ग्रंथालय क्षेञ व इतर क्षेत्रांतील समस्यांकडे  महाविकास आघाडी शासनाचे लक्ष वेधून महाराष्ट्र शासच्या विधान परिषद या वरिष्ठ सभागृहात मांडून सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवावी अशी विविध सघंटनांमधून आपणास आग्रह करण्यात येत आहे.
       
म्हणून समस्याग्रस्तांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी मी  ५ - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहे असे प्रा.ईश्वर मुंडे यांनी जाहीर केले आहे.
         
प्रा. ईश्वर मुंडे यांनी प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी अशी जिल्हा परिषद बीड अंतर्गत सेवा करून स्वैच्छा निवृत्ती घेवून सामाजीक कार्य चालू आहे.
          
ईश्वर शिक्षण संस्था,गांजपूरचे संस्थापक सचिव असून संस्थेअंतर्गत धारुर, केज व अंबाजोगाई तालुक्यात शाळा, कॉलेज व अनाथ विद्यार्थ्यांचे बालगृह चालू आहेत. या मुळे शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले नाव आहे.
     
साने गुरुजी सार्वजनीक वाचनालय, गांजपूरचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने सार्वजनीक वाचनालय क्षेत्रातही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.
       
त्यांनी नुकतीच अंबाजोगाई येथे ईश्वर प्रसाद अर्बन मल्टीपल निधी बँक कार्यरत केली आहे. त्यामुळे अर्थीक क्षेत्रातही चांगली सुरुवात केली आहे.
           
अशा प्रकारे आपला सामाजिक, शैक्षणिक,सहकार व आर्थीक क्षेत्रात चांगला संपर्क असून त्याच्या विश्वासावर सदरील निवडणूक लढवणार असून पदवीधर युवक -युवती, शैक्षणिक, ग्रंथालयीन व इतर समस्यांना भविष्यात विधान परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देवूअसा विश्वास त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त करुन बुधवार दि.११/११ / २०२० रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
close