संगमनेर । प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर शिवारात टँकरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ९, नोव्हेंबर रोजी सकाळी, ८:३० ला घडली आहे.
अश्वी कडून संगमनेर च्या दिशेने येणाऱ्या दुध वाहक टँकरने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचे जागीच मृत्यू झाला. आश्वी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी आहे की राहुरी तालुक्यातील, दुधाचा टँकर MH 17.T 5283, हा टॅंकर अश्वी कडून संगणमेर च्या दिशेने येत होता त्याच वेळी संगमनेर कडून आश्वी च्या दिशेने जाणारा दुचाकीस्वार अक्षय सोमनाथ गोसावी हा २२, वर्षीय दुचाकीस्वार चाललेला होता डोंगर वस्तीजवळ समोरून येणाऱ्या टँकरने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार अक्षय गोसावी याचाही जागीच मृत्यू झाला ही एक दुःखद घटना म्हणावी लागेल. याबाबत आश्वी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

