सावळीविहीर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्यामध्ये दिवाळी सण हा सर्वात मोठा सण व उत्सव मानला जातो मात्र यावर्षी कोरोणामुळे हा सण प्रत्येकाने इतर सणाप्रमाणे, उत्सवाप्रमाणे घरगुती व साध्या पद्धतीने साजरा करावा .एकत्रित नागरिकांनी जमा होऊ नये. असे राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले असून तसे राज्यातील विविध विभागांना त्यासंदर्भात राज्य सरकारने राज्यपालांच्या आदेशान्वये गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी तसे एका आदेशाने कळविले आहेत.
या परिपत्रकात राज्य सरकारने स्पष्ट म्हटले आहे की दिवाळी सणावर राज्यात मोठा सण आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असल्यामुळे इतर सणाप्रमाणे हा दिवाळी सण साध्या पद्धतीने नागरिकांनी साजरा करावा त्यासाठी गृह विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांनी प्रयत्नशील असावे राज्यामध्ये गेल्या सात महिन्यांपासून सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले जात असून दिवाळीचा सण ही साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा.
दिवाळीला कोणी फटाके फोडू नये फटाके पडल्यामुळे त्याच्या धुराचा त्रास बाधित व्यक्तीला किंवा संसारात आलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे एकत्रित नागरिकांनी गर्दी करू नये.दिवाळीच्या कालावधीत स्वच्छता पाळावी, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावा, बाजारपेठेत खरेदी करताना गर्दी करू नये,कोरोना संदर्भात दक्षता घ्यावी तसेच दिवाळीला अनेक पहाट दिवाळी किंवा अनेक कार्यक्रम होत असतात ते टाळावे. कोणत्याही उपक्रम किंवा सार्वजनिक कार्यक्रम करू नये असे या परिपत्रकात म्हटले असून गृह विभागाने परिपत्रक सर्व विभागांना पाठवले आहे, व त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे यात आदेशित करण्यात आले आहे.

