shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ शनिवारी जिल्हा दौर्‍यावर!..!


सावळीविहिर। (प्रतिनिधी ):
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे शनिवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

               मा.ना. छगन भुजबळ 

दिनांक ०७ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आगमन आणि गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी १२-३० वाजता कोपरगावहून शिर्डीकडे प्रयाण. दुपारी ०१ वाजता शिर्डी येथे आगमन व राखीव. दुपारी २ वाजता शिर्डीहून राहाताकडे प्रयाण. दुपारी २-१५ वाजता इरिगेशन बंगला, राहाता येथे आगमन आणि गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी ३-३० वाजता राहाता येथून नाशिककडे प्रयाण करणार आहेत ,   तसेच   
               मा.नरहरी झिरवाळ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा शनिवारी अकोले दौरा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.दिनांक ०७ रोजी दुपारी १२-३० वाजता शहापूर जिल्हा ठाणे येथून शासकीय विश्रामगृह, राजूर, ता. अकोले येथे आगमन व राखीव. दुपारी १-३० वाजता राजूर येथून अकोलेकडे प्रयाण. दुपारी २ वाजता अमोल वैद्य (पत्रकार) यांच्या महालक्ष्मी कॉलनी, अकोले येथील निवासस्थानी आगमन व राखीव, दुपारी ४ वाजता अकोले येथून नाशिककडे प्रयाण करणार आहे,
close