shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हृदयद्रावक ! मासेमारी करण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या मामा भाच्यांचा गाळात बुडून मृत्यू..!!

पुणे:-मासे पकडण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या मामा भाच्यांचा गाळात बुडाल्याने मृत्यू झाला. आंबेगाव तालुक्यातील लाखलगाव येथे आज दुपारी ही घटना घडली.
संजय शिवराम केदारी (वय 32) आणि ऋषिकेश विजय काळे (वय 8) अशी दोघांची नावे आहेत. मयत संजय केदारी हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लाखलगाव येथे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते मजुरीवर काम करून मासेमारीही करतात.

आज दुपारी संजय केदारी व भाचा ऋषिकेश लाखलगाव येथील राजोबा पाझर तलावात मासेमारी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान 10 ते 12 फूट खोल असलेल्या गाळात अडकले आणि पाण्यात बुडाले.

स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
close