shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना नियमाचे पालन करीत तालुक्यातील विद्यालय झाली सुरू!!

चाकूर : संजय माकणे (तालुका प्रतिनिधी)
गेली अनेक दिवसापासून कोरोना या महामारी मुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद होती पण आज शासनाच्या अध्यादेशा प्रमाणे शैक्षणिक वर्ष 2020 व 2021 याकरिता इयत्ता नववी व दहावी हे वर्ग चालू झाले. 

तालुक्यातील काही विद्यालयाचा आढावा घेतला असता चापोली येथील संजीवनी विद्यालय येथे सकाळी विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पटणे जी एन यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे टेंपरेचर, ऑक्सिजन लेवल, सॅनिटायझर करून विद्यालय मध्ये प्रवेश देण्यात आला. 

तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय येथे पण पालकांना तसेच विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन कोरणाचे सर्व नियम पाळून प्रवेश देण्यात आला.पालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
close