केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:- लॉकडाउनच्या काळातील वीज ग्राहकांना व शेतकऱ्यांना आलेले वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे. या साठी येथे वीज वितरण यांच्या कार्यालया समोर भाजपाच्या वतीने वीज बिलाची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, लॉकडाउनच्या व कोरोनाच्या महामारीच्या काळातही महाराष्ट्र शासनाने वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना अव्वाच्यासव्वा वीज बिले आकारली आहेत. त्यामुळे राज्यातील विविध ग्राहक प्रचंड अडचणीत आहेत. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज दि. २३ नोव्हेंबर रोजी केज येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून विज वितरण कंपनी व सरकारचा निषेध केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिकार्यांना या मागण्याचे एक निवेदन दिले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह सर्व आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

