शिर्डीला प्रवीणचंद लोखंडे पोलिस निरीक्षक पदी..!!
सावळीविहीर (राजकुमार गडकरी)
अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस निरीक्षकांच्या व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आज बुधवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बदल्या केल्या आहेत.
शिर्डी येथे रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांची बदली करण्यात आली असून ते आता शिर्डीचे पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या विनंतीवरून, प्रशासकीय व विविध कारणामुळे आज बुधवारी उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बदल्या केल्या आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण चंद लोखंडे यांची शिर्डी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर कोपरगाव शहराचे राकेश माणगावकर यांची कोतवाली पोलिस ठाण्यात अहमदनगरला पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांची अहमदनगरला नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच राहुरी येथील मुकुंद काशिनाथ देशमुख यांची संगमनेर शहर पोलिस निरीक्षक म्हणून पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.हनुमंत झुंबरराव गाडे हे शिर्डीला साई मंदिर सुरक्षा प्रभारी होते त्यांची बदली आता राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे प्रभाकर भाऊराव पाटील यांचे जामखेड येथून अहमदनगरला नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच नियंत्रण कक्ष अहमदनगर येथील सुहास भाऊराव चव्हाण यांचे अहमदनगरला आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील (लोणी पोलीस स्टेशन )यांची आता अहमदनगरला शहर वाहतूक शाखेचे मध्ये बदली करण्यात आली आहे.
तर श्रीरामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरेश पाटील यांची लोणी पोलीस स्टेशनला बदली झाली आहे .तर सचिन अशोक बागुल यांचे राहुरी पोलीस स्टेशन मधून आता शनिशिंगणापूरला पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र तुकाराम करपे यांची सोनई पोलीस स्टेशनला प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र अशोक सानप यांची अहमदनगरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे बदली झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्यानेच हजर झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी दिवटे यांची कर्जत येथे तर महेश जानकार यांची जामखेड येथे व अश्विनी रघुनाथ पाटील यांची अहमदनगरला वाचक शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. आज या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले असून सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिर्डी येथे बऱ्याच दिवसापासून पोलीस निरीक्षक पदे रिक्त होते. ते सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आलेला होता. मात्र आता येथे प्रवीणचंद लोखंडे यांची पोलीस निरीक्षक म्हणून शिर्डीला नियुक्ती झाली आहे .त्यामुळे शिर्डी परिसरातूनही समाधान व्यक्त होत आहे.

