संगमनेर। प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील घारगाव मध्ये चोरट्यांनी एक हायटेक नर्सरी वर डल्ला मारताना cctv त चोरटे कैद झाले. ही घटना १० नोव्हेंबर ला घडली आहे, सदर घटना अष्टविनायक हायटेक नर्सरी या ठिकाणी घडली.
यामध्ये चोरट्यांनी , टोमॅटो, शेवगा, मिरची, ही बियाणे चोरून नेली, व या नर्सरीचे मुख्य कार्यालय फोडून त्यातून रोख रक्कम लंपास केली. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, व पुन्हा चोरट्यांनी आपला डल्ला आता नर्सरीकडे वळवला आहे.
घारगाव मधील ही एक मोठी नर्सरी आहे व ह्या नर्सरीतून बी-बियाणे व काही रोख रक्कम चोरीला गेल्यामुळे आणि या नर्सरीचे खूप मोठे नुकसान झाल्यामुळे येथील पोलीस स्टेशनला तक्रार झाल्यामुळे या चोरी बाबत घारगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

