इंदापूर:प्रतिनिधी दि.11/11/20
आजोती-सुगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या नुतन उपसरपंचपदी निवड झालेल्या रूपाली बाळू कांबळे यांचा मंगळवारी(दि.10) पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आजोती येथे सत्कार करण्यात आला. यावेळी अंकिता पाटील यांनी नूतन उपसरपंच रूपाली कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.रूपाली कांबळे यांची ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी मंगळवारी निवड करण्यात आली.
![]() |
| आजोती-सुगावच्या नूतन उपसरपंच रूपाली कांबळे यांचा सत्कार करताना जि.प.सदस्या अंकिता पाटील. |
यावेळी अंकिता पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच नूतन उपसरपंच रुपाली कांबळे यांनी गावच्या विकासासाठी योगदान देवून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे,असे आवाहनही अंकिता पाटील यांनी केले.
याप्रसंगी सरपंच संजय दरदरे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राघु (नाना)काटे, साने गुरुजी विकास सोसायटी चेअरमन सुग्रीव(नाना) बोंगाणे, माजी उपसरपंच राहुल साळुंखे, ग्रुप ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब देवकर, विजय नागरे, श्रीरंग देवकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गोफणे, अप्पा कांबळे, राजेंद्र देवकर, दीपक देवकर, बाळासो देवकर, अतुल देवकर, अभिजित देवकर, शंकर कांबळे, ग्रा.पं.सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



