देवळाली प्रवरा - दि. ०६ नोव्हेंबर : देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे वतीने सुरू असलेले देवळाली प्रवरा - आंबी रस्त्याचे काम निकृष्ट प्रतीचे होत असलेने नगरपालिकेने पाहणी करून तात्काळ त्यात सुधारणा करण्यासाठी आप्पासाहेब भिमराज ढुस, नितीन मंजाबापू ढुस, बापूसाहेब रामराव दिघे, जालिंदर रायभान चव्हाण, दत्तात्रय खंडू चव्हाण आदींनि 30 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्याधिकारी अजित निकत यांना दिले.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे वतीने आंबी रस्ता, दवनगाव रास्ता, तसेच आंबी स्टोर आदी रस्त्यांचे पूर्वीच्या डांबरी रस्त्यावर खडी टाकून डांबरीकरण करण्याचे निकृस्ट प्रतीचे काम सध्या चालू आहे. पूर्वीचा डांबरी रस्ता तसाच ठेवून त्यावर खडी अंथरून किरकोळ डांबराचा मुलामा दिलेने हा रस्ता लगेच खड्डेमय होण्यास सुरुवात झाली आहे. साध्या हाताने ही खडी उकरून निघत असून त्या खाली कोरडी खडी निघत असल्याने या रस्त्यांचे काम एस्टीमेट प्रमाणे चालू नसल्याने मुख्याधिकारी साहेबांनी तात्काळ समक्ष पाहणी करून हे निकृस्ट दर्जाचे काम थांबविण्याची आणि या कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट होई पर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल रोखण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अजित निकत यांचेकडे केली आहे.
आप्पासाहेब भिमराज ढुस, नितीन मंजाबापू ढुस, बापूसाहेब रामराम दिघे, जालिंदर रायभान चव्हाण, दत्तात्रय खंडू चव्हाण, दगडू त्रिंबक ढुस, दादासाहेब दिघे, अमजदबेग इनामदार, संतोष चव्हाण, सुजित कदम, शंकर ढुस, बाळासाहेब ढुस, कुंडलिक ढुस, भास्कर ढुस, भाऊसाहेब चव्हाण, अनिल चव्हाण, विष्णू चव्हाण, रामनाथ उंडे, रमेश चव्हाण, रमेश ढुस, जगन्नाथ ढुस, बन्सी घोडेकर, भास्कर कानडे, अशोक जाधव, बाळासाहेब चव्हाण, हसन शेख आदींसह असंख्य नागरिकांच्या सह्या असलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, या रस्त्यांचे काम सुरू झाल्यावर रस्त्यालगत जे साईड गटार खोदले आहेत त्यात फक्त जवळच्या राजकीय व्यक्तींनाच सिमेंट पाईप टाकून जाणे येनेसाठी सुविधा करून दिली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. व असा भेदभाव न करता रस्त्याच्या लगत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सिमेंट पाइप टाकून रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी विनंतीही या निवेदनात करणेत आली आहे.

