shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावधान : संगमनेर मध्ये बिबट्याचा धुमाकूळ..,अकलापूर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या जागीच ठार..!!

संगमनेर प्रतिनिधी: ऋषिकेश जगताप.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात तोफिक बशीर चौगुले. या शेतकऱ्याच्या तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करीत तीनही शेळ्या जागीच ठार केल्या. कुरकुंडी येथील शेतकरी तोफिक चौगुले, याची अकलापूर येथील शेळकेवाडी शिवरात शेती आहे. चौगुले आपल्या शेतात शेळ्या चारत होते. 


त्याच दरम्यान अचानक गंधारी च्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्या वर अचानक हल्ला करीत तीनही शेळ्या ठार केल्या व या घटनेच्या वेळी चौगुले मोठ- मोठ्याने ओरडू लागले व आजूबाजूच्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेला धाव घेतली. मात्र बिबट्याने तीनही शेळ्यांचा गळा घोटून त्यांना ठार  मारले होते व बिबट्याने त्यातील एक शेळी आपल्या सोबत घेऊन गेल्याचे आढळले.

चौगुले यांनी ही माहिती तातडीने वनविभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी, दिलीप बेरट , बाळासाहेब वैराळ यांनी घटना स्थळी जाऊन सदर  घटनेचा पंचनामा केला. या पंचनामे तून चौगुले यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे, व ही घटना अजून एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्या बरोबर होऊ नये म्हणून बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करावा.अशी मागणीही करण्यात आली.
close