वडाळा महादेव [ वार्ताहर ] : -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोड वरील श्र .श्री. रविशंकर विद्यामंदिर शाळेचे कार्य तसेच शिक्षण प्रणाली कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनचे ( डब्ल्यूसीपीए ) नॅशनल मिडीया को- ऑर्डीनेटर व डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष व डॉ दत्ता विघावे यांनी केले.
सध्या देशात तसेच राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून त्याचे पडसाद शैक्षणिक क्षेत्रावर उमटले असून शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासकीय आदेशाप्रमाणे व नियमाचे पालन करत शैक्षणिक संस्थांनी शाळा महाविद्यालय बंद करून ऑनलाइन अभ्यास घेण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप कसार यांनी निर्णय घेत विद्यार्थी पालक व शिक्षक यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपाय योजना करून अभ्यासक्रम सुरू केला, तसेच शाळेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक पर्यावरण अशा विविध क्षेत्रात वाटचाल करून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास केला या सर्व कार्याची दखल घेत जागतिक संविधान संसद संघ यांनी दखल घेत श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेचा गुणगौरव करत अध्यक्ष संदीप कसार यांना सन्मानित केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री दिलीप नवले यांनी केले. सदर कार्म क्रमास डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे सचिव भाऊराव माळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब कसार, पत्रकार राजेन्द्र देसाई आदी उपस्थित होते. शेवटी श्री संदीप कसार यांनी आभार मानले.

