घोडेगाव प्रतिनिधी(मोहन शेगर):
श्रीस्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बाल संगोपन केंद्र घोडेगाव ता नेवासा जि अहमदनगर संस्थेतर्गत भटक्या विमुक्तातील अनाथ निराधार मुलांना कपडे व खाऊंचे वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
घरी अठराशेविश्व दारिद्र्य असल्याने या मुलांना दिवाळी साजरी करता येत नाही संस्थेने चालवलेला उपक्रम खरोखरच चांगला आहे. काशिनाथ चौगुलेंचे काम खुपच कौतुकास्पद आहे. आम्ही सगळे एकत्र येऊन त्यांना मदत करु असे मनोगत घोडेगावचे सरपंच श्री राजेंद्र देसरडा यांनी व्यक्त केले.
विंचवाचे बिह्राड पाटीवर असणाय्रा या समाजाला दिवाळी म्हणजे काय असते हे सुध्दा माहीत नाही. गावोगावी भटकंती करनाय्रा या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम या संस्थेने केले.या मुलांनासाठी हक्काचा निवारा म्हणून भविष्यात महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे नाव आदराने घेतले जाईल असे प्रतिपादन श्री कराळे सर यांनी केले.
सदरील कार्यक्रमास मा. उपसरपंच पारसकाका चोरडीया ग्रा.पं.स. निसारभाई सय्यद. मा.चेअरमन ज्ञानेश्वर पाटील सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर जगधने( ग्रामीण पत्रकार संघ राहुरी) किशोर पानोरे. वसतिगृह अधिक्षक सागर शिंदे आनि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

