shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दीपोत्सवासाठी मातीच्या पणत्या बनविण्यात कुंभार कारागीर मग्न! मात्र चिनी मातीच्या नक्षीदार पणंत्यांना वाढली मागणी..!!

सावळीविहिर। प्रतिनिधी:
दिपावली हा  दिव्यांचा उत्सव असतो ,अशी ही दीपावली  काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे दिवाळीसाठी दिवे लावण्यासाठी मातीच्या पणत्या बनवण्याचे काम सावळीविहीर जवळील रुई येथील कुंभारवाड्यात मोठ्या जोमाणे आता सध्या सुरू आहे. असे चित्र येथे दिसून येत आहे.

दीपावली काही दिवसावर येऊन ठेपली आहे ,या दिवाळी सणाला दीप लावण्याचे घरोघरी प्रथा आहे. हा दिवाळीचा सण म्हणजे दीपोत्सव असतो. त्यामुळे दिवे लावण्यासाठी पूर्वीपासून मातीच्या पणंत्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा मातीच्या पणत्या बनवण्याचे काम कुंभार कारागिरी करत असतात. दिवाळी च्या अगोदर काही दिवस या पणत्या बाजारात विकण्यासाठी आणल्या जातात. त्यामुळे या आगोदरच तयार होणे गरजेचे असते. त्यासाठी आता त्या जोराने रात्रंदिवस काम करून कुंभार कारागीर तयार करत आहेत. मातीच्या पणत्या फिरत्या चाकावर बनविण्याची ही कला आहे व ही कला आत्मसात केलेले कुंभार कारागीर आपल्या रोजीरोटीसाठी या पणत्या बनवत आहेत. सध्या कोरोणामुळे सर्व सण उत्सव साधेपणाने साजरे होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या यावर्षीच्या सणावर ही आर्थिक संकट आहे. त्यामुळे प्रत्येक जण आर्थिक काटकसर या सणासाठी या वर्षी करणार आहे व करत आहे. त्याचप्रमाणे कोरोणा मुळे सर्वच ,चिकन माती ,त्यासाठी लागणारे मजूर व इतर साहित्य महाग झाले आहे. त्यामुळे मातीच्या पणत्या बनवणे ही महाग पडत आहे. शिवाय चिनी मातीच्या वेगवेगळ्या आकाराच्या नक्षीदार अशा पणत्या बाजारात विक्रीला येत आहेत व त्या आकर्षक दिसत असल्यामुळे ग्राहक नागरिक या नक्षीदार चिनी मातीच्या पणत्या घेण्याकडे अधिक आकर्षित होत आहे. त्यामुळे पूर्वी सारख्या आपल्यामातीचा पणत्या बनवणारा कुंभार कारागीर मात्र आणखीनच आर्थिक संकटात त्यामुळे सापडला आहे. सध्या चिनी मातीच्या नक्षीदार पणत्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे या मातीच्या पारंगत अशा पणत्या हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहे. मात्र नागरिकांनी आपली परंपरा म्हणून या मातीच्या पणंत्यांना ही अग्रक्रम द्यावा.अशी मागणी कुंभार कारागीर करतआहेत. 

सध्या रुई तालुका राहता येथे कुंभार कारागीर कुंभार वाड्यांमध्ये रात्रंदिवस या मातीच्या पणत्या मोठे श्रम घेऊन आपल्या कलेचा वापर करत तयार करत आहेत. मात्र दिवसेंदिवस या कलेला या श्रमाला मोल राहिलेले नाही. आयत्या चिनी मातीच्या नक्षीदार पणत्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे पारंपारिक कुंभार कारागीर मधूनही नाराजी दिसून येत आहे.
close