राहुरी - राहुरी तालुक्यातील डाळिंब फळ पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई चे आदेश होणे बाबत आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे की,राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सततच्या भिज पावसाने हवेतील आर्द्रता वाढून डाळिंब पिकावर बुरशी वाढली व मोठया प्रमाणात तेल्या रोगाने डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे.
राहुरी तालुक्यात २७०० हेक्टर क्षेत्र डाळिंब लागवडी खाली असून तालुक्यात १३०० हेक्टर डाळिंब पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे लागवडीच्या जवळपास ६० ते ७० % क्षेत्राचे तेल्या रोगाने नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाने शासनाला ऑगस्ट २०२० मध्ये प्राथमिक अहवालाद्वारे कळविले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा या नुकसानीबाबद त्यांचा निष्कर्ष माध्यमातून प्रसिद्धी देऊन त्यावर उपाय सुचवले होते. तथापी सततच्या भिज पावसाने शेतकरी त्यावर उपाययोजना करू शकले नाहीत. पर्यायाने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या डाळिंब फळबाग सोडून इतर पिकांचे पंचनामे सुरू असल्याने तेल्या रोगाने नुकसान ग्रस्त डाळिंब बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणून आपणास विनंती की, कृषी विभागाने ऑगस्ट २०२० मध्ये काळविलेल्या १३०० हेक्टर क्षेत्र नुकसानीच्या प्राथमिक अहवाल व आकडेवारी नुसार तेल्या रोगाने राहुरी तालुक्यात डाळिंब फळ पिकाचे जे नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणेचे संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत. असे आप्पासाहेब ढुस यांनी विनंती पत्रात म्हंटले आहे.

