उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान..
शिर्डी प्रतिनिधी :
कु. किरण जाधव
गेल्या काही काळात देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील अन्य विभागाप्रमाणे कोपरगांव व राहाता तालुक्यांचा समावेश असलेल्या शिर्डी उपविभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता.
तथापि, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, दोन्ही नगर परिषद आणि स्वयंसेवी संस्था यांनी अंमलबजावणी केलेल्या उपाययोजना आणि त्याला नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शिर्डी उपविभागात कोरोना नियंत्रणात आला आहे.
कोविड2019 संसर्ग विषाणू आपत्ती निवारणासाठी शिर्डी उपविभाग व कोपरगाव तालुक्यात ‘समन्वयक’ म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल कोपरगांव येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मदत कार्याचे समन्वयक सुशांत घोडके यांना आज उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ‘कोविड योध्दा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागरिकांमध्ये जनजागृती उपक्रम राबविणे, लॉकडाऊन काळात गरजूंना लोकसहभागातून अन्न पुरवठा करणे, कोरोना संसर्ग बाधित रुग्णांचे समुपदेशन व मदतकार्य केल्याबद्दल तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होऊन जनजागृती केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
सूर्यतेज संस्था, कोपरगावचे ते संस्थापक आहेत.
यावेळी कोपरगावचे तससिलदार योगेश चंद्रे, नायब तहसिलदार विलास वैद्य तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

