shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डी.टी.आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकदान अभियान..!!

शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांचा दि.10/नोव्हेंबर/2020 रोजी वाढदिवस असून त्या निमित्तांने पुस्तकदान अभियान ही संकल्पना राबविण्यात येत आहे. लातूर शहरात दि.10 /नोव्हेंबर/2020 रोजी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांचा वाढदिवस पुस्तकदान अभियांनाने साजरा करण्यात येत असून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कोणीही, पुष्पगुच्छ आणू नये तर वैचारिक, प्रेरणादायी, सक्सेस स्टोरी, महापुरूषांची विविध पुस्तके भेट द्यावे.

 ही भेट दिलेली पुस्तके प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील ग्रंथालय व अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना दान देण्यात येणार आहेत. लातूर शहर व जिल्ह्यातील जे पत्रकार बांधव, डाॅक्टर,शिक्षक, उद्योजक, समाजसेवक पुस्तक दान देऊ इच्छितात त्यांनी दि. 9/नोव्हेंबर व 10 नोव्हेंबर/2020 रोजी 9270559092/ 7499177411(डी.टी.आंबेगावे) या मो नंबरवर संपर्क साधावा. आम्ही ते पुस्तक आपल्या घरी येऊन संकलन करू, तरी लातूर शहरातील दानशूर व्यक्तीने आम्हाला पुस्तक दान करून सहकार्य करावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी आवाहन केले आहे.
close